Marathi Movie Telly Masala Marathi Serial Latest Update Raj Thackeray On Waheeda Rehman Honoured With Dadasaheb Phalke Award Lata Mangeshkar Birth Anniversary Siddharth Jadhav Kalawant Dhol Tasha Pathak Pune Aadesh Bandekar

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या…

Raj Thackeray : “स्वत:चं मुस्लिम आडनाव पण…”; दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी केलं वहिदा रेहमान यांचं कौतुक

Raj Thackeray On Waheeda Rehman Honoured With Dadasaheb Phalke Award : ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान (Waheeda Rehman) यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने वहीदा रेहमान यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील ट्वीट करत वहिदा रेहमान यांचं कौतुक केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Lata Mangeshkar : लता मंगेशकर पांढऱ्या रंगाची साडी का नेसायच्या? संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिदींना आवडायचे हिऱ्यांचे दागिने

Lata Mangeshkar Birth Anniversary : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) नेहमीच पांढऱ्या रंगाची साडी नेसायच्या हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी नेसलेली पांढऱ्या रंगाची साडी कधी प्लेन असते तर कधी वेगळ्या रंगाची बॉर्डर असते. अनेकदा त्या सिल्कच्या साड्या नेसत असे. लता मंगेशकर यांना साड्यांची (Lata Mangeshkar Saree) भयंकर आवड होती. पण पांढऱ्या रंगाची साडी ही लता दिदींची ओळख होती.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Siddharth Jadhav : आता होऊ दे धिंगाणा म्हणत सिद्धार्थ जाधवचं ढोल वादन; पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा गजर

Kalawant Dhol Tasha Pathak Pune : पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा (Kalawant Dhol Tasha Pathak Pune) जल्लोष पाहायला मिळत आहे. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), श्रुती मराठे (Shruti Marathe), आस्ताद काळे (Astad Kale), दिप्ती देवी (Dipti Devi), सौरभ गोखलेसह (Saurabh Gokhale) अनेक कलाकार ढोल वादनात सहभागी झाले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

मिसेस मुख्यमंत्रीही म्हणतात ‘बाईपण भारी देवा’..; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर कार्यक्रमात मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे (Lata Eknath Shinde) उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. ठाणे महानगरपालिका गणेशोत्सव मंडळाने मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला लता शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aadesh Bandekar : मुंबईचा राजा.. गणेश गल्ली मिरवणूक वादनात आदेश बांदेकर दंग; पाहा फोटो

Aadesh Bandekar : मुंबईचा राजा.. गणेश गल्ली मिरवणूक वादनात आदेश बांदेकर दंग झाले होते. आदेश बांदेकरांचे मिरवणुकीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत आदेश बांदेकर बँड वाजवताना दिसून आले. आदेश बांदेकरांनी विसर्जन मिरवणुकीत चांगलाच जल्लोष केला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *